कुडाळ | प्रतिनिधी
शिर्डी येथील श्री साईबाबा यांच्या चरणी गेली ३० वर्ष कुडाळ शहरातील श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ सेवा करीत आहे भजन सेवेपासून सुरुवात झालेल्या या परंपरेला आता दिंडी पर्यंत आली आहे यावर्षी १ ऑगस्ट रोजी साईबाबांच्या चरणी हे मंडळ भजन व दिंडी सादर होणार आहे.
शिर्डी येथील श्री साईबाबांच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे समजले जाते श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते गेली ३० वर्ष ही सेवा करीत आहेत रंगभूषाकार विलास कुडाळकर यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू झाली. दरवर्षी शिर्डीमध्ये श्री साई चरित्र पारायण केले जाते या कालावधीमध्ये श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ सेवा करते सुरुवातीला भजन सादर केले जात होते त्यानंतर गेले १४ वर्ष या ठिकाणी श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने हलते देखावे सादर केले जातात या दिंडीमध्ये हे देखावे सहभागी करून घेतले जातात यावर्षी सुद्धा श्री साई चरित्र पारायण मध्ये श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने भजन व देखावे घेऊन जाणार आहेत १ ऑगस्ट रोजी ते दिंडीमध्ये सहभागी केले जाणार आहेत. या सेवेमध्ये महेश काणेकर, सत्यवान राऊळ, गोपाळ राऊळ, चंदन दळवी, प्रतीक राऊळ, गजानन घाटकर, प्रभाकर घाटकर, सुशील परब, राकेश राऊळ, रमेश मेस्त्री, गणेश राऊळ, रुपेश कुडाळकर, निलेश कुडाळकर, तन्मय घाटकर, शशांक राऊळ, अनिकेत घाटकर, सचिन कोंडस्कर, केदार राऊळ, कपिल परब, उमेश राणे, संदेश घाटकर, रोहित राऊळ, शार्दुल राऊळ, साईराज राऊळ हे सर्व कार्यकर्ते सहभागी असणार आहेत. अशी माहिती महेश कुडाळकर यांनी दिली.


