Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळचेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात ;...

चेंदवण येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा हात ; चेंदणकर यांच्या घरावर कोसळले होते झाड 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

चेंदवण येथील भारतरत्न डॉ आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते यांच्या माध्यमातून आर्थिक मदत सुपूर्त व टॅम्पो भरून पत्रे व अन्य साहित्य पाठवून घराच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली.

 

चेंदवण डॉ. आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५ जुलै २०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत हे पॅरालेसिस या आजाराने त्रस्त असल्याने जाग्यावर आहेत. सध्या कुटुंबाला घर दुरुस्तीसाठी तात्काळ मदतीची गरज असल्याचे शिवसेना आमदार निलेश राणे यांना समजताच शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व शिवसेना नेते संजय पडते माध्यमातून श्री.अनंत चेंदवणकर यांच्या पत्नीकडे आर्थिक मदत देण्यात आली व घर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य पाठवून घर दुरुस्तीचे काम तत्काळ चालू करण्यात आले यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, शिवसेना संघटक रुपेश पावसकर, दशावतार राज्य कमिटी सदस्य देवेन नाईक, शिवसेना नेरूर विभाग प्रमुख किशोर सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश नाईक देवेन नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!