गणेश उत्सवाच्या निमित्ताने मोफत रेल्वे प्रवासाची आमदार निलेश राणे कडून व्यवस्था
कुडाळ | प्रतिनिधी
गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमदार निलेश राणे यांनी शिवसेना एक्सप्रेस ही विशेष रेल्वे गाडी गणेश भक्तांसाठी मोफत सोडली आहे २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानक ते कुडाळ रेल्वे स्थानक असा या गाडीचा प्रवास असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे गणेश भक्तांसाठी आमदार निलेश राणे यांनी मोफत रेल्वे प्रवासाची व्यवस्था केली आहे सोमवार २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ही रेल्वे दादर रेल्वे स्थानक ते कुडाळ रेल्वे स्थानक पर्यंत असणार आहे हा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे याला सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. गणेश चतुर्थी निमित्त आपल्या नातेवाईकांना चाकरमान्यांना भेटता यावे तसेच आनंदाने हा सण कुटुंबासोबत साजरा करता यावा म्हणून या मोफत सेवेचे आयोजन केले आहे ज्या गणेश भक्तांना या रेल्वे गाडी मधून प्रवास करायचा आहे त्यांनी सोमवार ते शनिवार यादरम्याने सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वा. या वेळेमध्ये (८६५२४८९९६४), (८६५२२७२०३१) येथे संपर्क साधावा. आणि शिवसेना एक्सप्रेस विशेष रेल्वे गाडीसाठी आरक्षित जागा कराव्यात असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे.


