कुडाळ | प्रतिनिधी
आपल्या चुलत काकीच्या गळ्यातील सोन्याच्या माळेच्या फसवणूक प्रकरणी सखाराम मारुती टिळवे याची कुडाळ दिवाणी न्यायाधीश यांनी जामीनावर मुक्तता केली याप्रकरणी आरोपीच्या वतीने ॲड. विवेक मांडकुलकर यांनी युक्तिवाद केला तसेच ॲड. प्रणाली मोरे, ॲड. विनय मांडकुलकर, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. सुयश गवंडे यांनी काम पाहिले.
संशयीत सखाराम टीळवे याने २२/०७/२०२५ रोजी रात्री त्याची चुलत काकी मंदाकिनी रामचंद्र टीळवे या आपल्या घरात बसलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या माळेचा फोटो काढायचा आहे असे त्याने सांगितले त्यांनी त्याच्या समोर सोन्याची माळ काढून त्याच्या समोर बाकावर ठेवली तेव्हा त्यांनी त्या माळेचा फोटो काढला. त्या नंतर तो फोन वर बोलत घराच्या बाहेर गेला तो काही वेळ आला नाही म्हणून त्याच्या शोधा साठी त्याला आवाज देत बाहेर गेल्या त्याला पाहताच त्यांनी माळेची मागणी केली तेव्हा त्यांनी पिवळसर रंगाची माळ त्यांना दिली त्या माळे बद्दल संशय आला त्या नंतर मंदाकिनी यांनी कुडाळ येथील एका सुवर्णकारला दाखवली असता त्यांनी ती माल खोटी असल्याचे सांगितले. सदरची माळ १७ ग्राम वजनाची असून त्याचे किमत ५१,०००/- रु एवढी होती. म्हणून तीनी कुडाळ पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. त्या अनुशंगाने कुडाळ पोलिसानी त्याचा विरुद्ध दिनांक २५/०७/२०२५ रोजी भा.न्या.स. ३१६(२), ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल केला व त्याच दिवशी त्याला भा.न्या.स. कलम ३५(३) अन्वये नोटीस दिली. पोलिसांनी आरोपीला २७/०७/२०२५ रोजी अटक करून २८/०७/२०२५ कुडाळ मे. न्यायालयात रिमांड रीपोर्ट समवेत हजर केले. व पाच दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली. न्यायालया समोर ॲड. विवेक भा. मांडकुलकर यांनी भा.न्या.स. कलम ३५(३) अन्वये दिलेल्या नोटीसीचा उलेख करून पोलीस कोठडी ना मंजूर करण्याचा युक्तिवाद केला. न्यायालयाने सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून पोलीस कोठडी नामंजूर केली. त्याच दिवशी आरोपी तर्फे जामिनासाठी अर्ज देण्यात आला त्याची सुनावणी दि. २९/०७/२०२५ रोजी होऊन मे. न्यायालयाने आरोपीची रु. ५०,०००/- व अटी शर्तीवर आरोपीचा जामीन मंजूर केला.


