Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील बॅ. नाथ पै. विद्यालय मध्ये...

कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील बॅ. नाथ पै. विद्यालय मध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन महिला बालकल्याण निधी मधून बसवण्यात आली…

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ नगरपंचायत महिला व बालकल्याण विभागातर्फे शहरातील बॅ. नाथ पै. विद्यालय मध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन महिला बालकल्याण निधी मधून बसवण्यात आली. या मशीनचे उद्घाटन कुडाळच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेविका सौ. उषा आठले यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी महिला बालकल्याण सभापती सौ. आफरीन करोल, नगरसेविका चांदणी कांबळी, श्रेया गवंडे, संध्या तेरसे, शाळेचे मुख्याध्यापक राठोड इतर सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थींनी उपस्थित होत्या. सॅनिटरी वेंडींग मशीन हे विद्यार्थीनींच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला उपक्रम आहे. तसेच त्यांना आपल्या आरोग्यासंदर्भात जनजागृती व्हावी आणि त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून आमचे प्रयत्न असल्याचे नगराध्यक्षा प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी सांगितले. तसेच माझी वसुंधरा अभियान ६ कुडाळ न.पं. व्दारे पुर्ण शहरात राबवीण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझी वसुंधरा शपथ घेण्यात आली. वृक्ष लागवड व संवर्धन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, प्लास्टिकमुक्त कुडाळ, कचऱ्याचे वर्गीकरण तसेच सॅनिटरी नॅपकीन विल्हेवाट लावण्याची पद्धती याबाबत जनजागृती करण्यात आली. या अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना नगराध्यक्षा प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!