Friday, May 8, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकुडाळ न्यायालय व पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या तळवडे बादेवाडी येथील रुपेश...

कुडाळ न्यायालय व पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या तळवडे बादेवाडी येथील रुपेश रमेश सावंत याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी…

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ न्यायालय व पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या तळवडे बादेवाडी येथील रुपेश रमेश सावंत याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

कुडाळ पोलिसांनी खान व खनिज अधिनियमा खाली डंपर क्रमांक (एमएच-०७- सी -५५७७) हा जप्त केला होता दरम्यान हा डंपर ताब्यात मिळावा म्हणून रुपेश सावंत याने या डंपरचा मालक असल्याचे भासवून खोटे शपथपत्र तयार करून न्यायालयात दाखल करून मयत असलेला त्याचा भाऊ प्रवीण रमेश सावंत याची बनावट सही करून त्या आधारे न्यायालयाचे आदेश प्राप्त केले व आदेशान्वये वाहनाचा मालक आपण स्वतः असल्याचे भासवून व तशी बनावट कागदपत्रे सादर करून डंपरचा ताबा घेतला. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार जनार्दन झारापकर यांनी रुपेश सावंत याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती न्यायालय व पोलिसांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक केली असता तीन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!