कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील तुळसुली कदमवाडी येथे जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या अंगणवाडी वर्गाचे काम पूर्ण झाले असून या नव्या अंगणवाडीचा लोकार्पण सोहळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी शिवसेना उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री. संजू परब, जिल्हा संघटिका सौ. दीपलक्ष्मी पडते, अंगणसेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला आणि अंगणवाडीच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


