कुडाळ | प्रतिनिधी
आपल्या गावाचे सौंदर्य हे आपणच टिकून ठेवले पाहिजे त्यासाठी स्वच्छ गाव सुंदर गाव ही सुद्धा संकल्पना राबवणे गरजेचे आहे आपल्या गावाला जो जिल्हा सुंदर गाव पुरस्कार मिळाला आहे याचे सातत्य ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक ग्रामस्थाची असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी तुळसुली कार्यात नारूर गावाला प्राप्त झालेल्या जिल्हा सुंदर गाव पुरस्काराच्या गौरव कार्यक्रमावेळी केले.
कुडाळ तालुक्यातील तुळसुली कार्यात नारूर या गावाला जिल्हा सुंदर गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे या निमित्ताने ग्रामपंचायत येथे गौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख संजू परब, संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, सरचिटणीस दादा साईल, सरपंच नूतन आईर, उपसरपंच नागेश आईर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी गावातील ग्रामस्थांचे अभिनंदन केले आणि गावाच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आपले हे सातत्य असेच राहिले पाहिजे आपला गाव सुंदर दिसण्यासाठी आणि ठेवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.


