Thursday, May 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedनेरूर सायचे टेंब येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश...

नेरूर सायचे टेंब येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश…

कुडाळ | प्रतिनिधी 

तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुम्हाला अपेक्षित असणारा विकास आमच्या माध्यमातून होईल असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी नेरूर सायचे टेंब येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्यानंतर केले.

नेरूर सायचे टेंब येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला त्यामुळे सायचे टेंब येथे उबाठाला खिंडार पडले आहे या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी महापौर दत्ता दळवी, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, निवडणूक प्रमुख देवेंद्र नाईक, उमेदवार संजय पडते, पंचायत समिती उमेदवार नीता नाईक, ममता देसाई, जिल्हा बँक संचालक नीता राणे, नेरूर सरपंच घाडीगांवकर, उपसरपंच म्हादळकर, वालावल सरपंच राजेश प्रभू, माजी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, माजी उपसरपंच समद मुजावर आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की आपल्या गावाचा विकास हा महायुतीच्या माध्यमातून होऊ शकतो यापूर्वीचे आमदार यांनी या भागाला विकासापासून वंचित ठेवले. तुम्ही त्यांच्या पक्षामध्ये होता पण आता तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आला आहात ज्या विश्वासाने तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला आहात त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही तुम्हाला योग्य तो मानसन्मान आणि निधी मिळेल शिवसेना हा एक पक्ष नसून ते कुटुंब आहे असे सांगून समोरचा उमेदवार कोण आहे त्यापेक्षा आपला उमेदवार किती सक्षम आहे हे पाहिले पाहिजे संजय पडते हे गेले अनेक वर्ष जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या भागासाठी झाला पाहिजे यासाठी त्यांना मतदान करणे आपले कर्तव्य आहे तुम्हाला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

नेरूर सायचे टेंब येथील उबाठाच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करताना आमदार निलेश राणे व पदाधिकारी 

 

फोटो प्रथमेश जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!