कुडाळ | प्रतिनिधी
अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी तहसीलदार वीरसिंग वसावे हे विशेष पथक निर्माण करणार आहेत त्या संदर्भात त्यांनी आदेश काढले आहेत दरम्यान कर्ली नदीच्या काठावर असलेल्या कवठी व चेंदवण परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे व तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी कारवाई केली आहे.
कुडाळ तालुक्यातील काठावर असलेल्या कवठी व चेंदवण गावामध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या रॅम्पवर महसूल विभागाने कारवाई केली. ही कारवाई प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे व तहसीलदार वीरसिंह वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, वालावल मंडळ अधिकारी श्वेता दळवी, ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, सोनाली मयेकर, स्नेहल सागरे, शिवदास राठोड या पथकाने ही कारवाई केली. यामध्ये चेंदवण येथील ६ वाळूचे रॅम्प तर कवठी येथील २ वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले हे बेकायदा वाळू उत्खनन थांबवण्यासाठी परिसरात ग्रस्त करण्याचे आदेश तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी दिले असून असे प्रकार होऊ नये म्हणून विशेष पथकाचे आदेश त्यांनी दिले आहे.


