कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील सुमारे ५०० लमाणी लोक मालवणला मोलमजुरी करून पोट भरतात. साफसफाई ते गवंडीकामात तरबेज असतात. *विनायक मानवर* हा आमच्या दांडी गावातील लमाणी समाजातील मुलाची नौदलात *अग्नीवीर* म्हणून निवड झाल्याबद्दल दांडी गावातर्फे त्याचा व त्याच्या आईचा माझ्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोरोना लॉकडाऊनच्या काळात या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली होती तेव्हा त्याच्या आईला मी माझ्या नारळाच्या बागेत काम दिले होते. दांडी शाळेत प्राथमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूल मध्ये माध्यमीक शिक्षण स. का. पाटील कॉलेजमधून तो पदवीधर झाला आणि स. का. पाटील कॉलेजच्या NCC मध्ये उत्कृष्ट कॅडेट म्हणून त्याची निवड झाली होती.
*लमाणी समाजातील मुलगा ⚓ नौदलात अग्नीवीर झाला*
RELATED ARTICLES


