Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी...

कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटचा लोकार्पण सोहळा संपन्न…

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. 

एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल चार्जिंग च्या समस्येला सामोरे जावे लागते ही समस्या लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शहर प्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या माध्यमातून पुढे एसटी बस स्थानक येथे मोबाईल चार्जिंग पॉइंट ची सेवा उभारण्यात आली या मोबाईल चार्जिंग पॉइंटचा लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढून पार पडला. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, शहर प्रमुख अभी गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, चेतन पडते, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, युवा सेनेचे वालावलकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!