Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्य पुरवणी बजेट अंतर्गत 2 पुलांची मंजुरी...

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्य पुरवणी बजेट अंतर्गत 2 पुलांची मंजुरी…

जीर्ण झालेल्या निळेली आणि आकेरी आंबेरी रस्त्यावरील पुलांची होणार पुनर्बांधणी..

 

कुडाळ | प्रतिनिधी 

हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये कुडाळ तालुक्यातील 2 पुलांसाठी एकूण 1 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

यात राज्य मार्ग 190 वरील निळेली पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 70 लाख तर प्रमुख जिल्हा मार्ग 51 (MDR) वरील आकेरी आंबेरी वाडोस रस्त्यावरील पुलाची पुनर्बांधणीसाठी 65 लाख निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही बांधकामे होणार आहेत. 

कुडाळ व मालवण तालुक्यातील जुनी जीर्ण व वाहतुकीस धोकादायक झालेल्या पुलांची पुनर्बांधणी करण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन दिले होते, त्यातील पहिल्या टप्यात दोन पुलांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!