नारूर गावामध्ये बिबट्याचे थैमान, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..! वनविभागाच्या भूमिकेवर ग्रामस्थ आक्रमक
कुडाळ | प्रतिनिधी
नारूर गावामध्ये सध्या बिबट्याने थैमान घातले आहेत लोकवस्तीपर्यंत बिबटा आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे या संदर्भात वनविभागाशी ग्रामस्थांनी संपर्क करून सुद्धा वनविभागांनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केला आहे त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
गेले काही दिवस नारूर गावामध्ये बिबट्याने थैमान घातले आहे जंगलातून बिबट्या सरळ लोकवस्तीत घुसून या ठिकाणी पाळीव प्राण्यांना शिकार करत आहे दोन दिवसापूर्वी नारूर गावचे पुजारी भागवत यांच्या घराच्या टेरेसवर बिबटा गेला होता त्यामुळे त्यांच्या घरातील अनेक जण घाबरले या बिबट्याचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामस्थांनी वनविभागाला सातत्याने पत्रव्यवहार केला आहे मात्र वनविभाग पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त केला नाही तर वनविभागाच्या कार्यालयावर ग्रामस्थ धडकतील अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे या बिबट्यामुळे ग्रामस्थांना शेतीमध्ये जाणे तसेच फिरणे कठीण झाले आहे या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


