आपल्या वाढत्या प्रादेशिक नेटवर्कमध्ये विजयवाडा, राजमुंद्री, नांदेड, दाबोळी आणि हुबळी या शहरांचा समावेश करणार आहे.
पणजी, जानेवारी २०२६: फ्लाय९१ या प्रादेशिक विमानसेवेने नुकतेच आंध्रप्रदेश आणि कर्नाटक येथे विमानसेवा विस्तारण्याची घोषणा करत यूएई मुख्यालय असलेल्या जागतिक विमानसेवा प्रदाता दुबई एअरोस्पेस एंटरप्राइझ (DAE) कडून दोन ATR 72-600 टर्बोप्रॉप विमाने भाडेतत्त्वावर घेतली आहेत.
ही दोन नव्या विमानांची डिलिव्हरी या महिन्याच्या उत्तरार्धात फ्रान्समधील टुलूज येथील ATR च्या उत्पादन केंद्रातून होणार आहे .ही दोनही नवीन विमाने जानेवारी २०२६ मध्ये वितरित होणार, त्यानंतर फ्लाय९१ आपल्या क्षमतेत तसेच उड्डाणांची वारंवारता वाढवणार आहे अशी माहिती विमानसेवेकडून प्राप्त झाली आहे. या नवीन विमानांनंतर फ्लाय९१ची कर्नाटकातील हुबळी तसेच आंध्रप्रदेशातील विजयवाडा आणि राजमुंद्री महाराष्ट्रातील नांदेड; आणि गोव्यातील दाबोळी या गंतव्यस्थळांपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे.
नवीन दोन ATR विमानांच्या समावेशानंतर फ्लाय९१च्या ताफ्यातील एकूण विमानांची संख्या सहा होईल. टियर-२ आणि टियर-३ शहरांपर्यंत आपले जाळे विस्तारण्याच्या कंपनीच्या ठोस धोरणाला हा महत्त्वाचा टप्पा बळकटी देणारा असून, प्रादेशिक हवाई संपर्क अधिक मजबूत करण्याच्या उद्दिष्टाकडे हे एक निर्णायक पाऊल आहे.
“नियंत्रित व टप्प्याटप्प्याने वाढ साधत सक्षम आणि विस्तारक्षम प्रादेशिक विमानसेवा उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला हा व्यवहार अधिक बळ देणारा असून, ATR 72-600 हे अल्प पल्ल्याच्या प्रादेशिक मार्गांसाठी कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि कामगिरी यांचा आदर्श समतोल देणारे आमच्या कार्यपद्धतीचे महत्त्वाचे अंग आहे; डीएईसोबतची पुनःएकदा झालेली भागीदारी आर्थिक शिस्त आणि भांडवली कार्यक्षमतेची जपणूक करत ताफा विस्तारण्यास आम्हाला मदत करणार आहे,” असे फ्लाय९१ चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनोज चाको यांनी सांगितले.
फ्लाय९१च्या ताफा धोरणाचा कणा ठरलेले ATR 72-600 विमान सिद्ध टर्बोप्रॉप अर्थकारण, कमी अंतरात सुरक्षित टेकऑफ व लँडिंग करण्याची क्षमता तसेच दुय्यम व दुर्लक्षित विमानतळांवर प्रभावीपणे कार्य करण्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे विशेष महत्त्वाचे ठरते
मार्च २०२४ मध्ये व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात केल्यानंतर फ्लाय९१ने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सोलापूर, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांच्याशी जोडणारे प्रादेशिक जाळे उभारले आहे. तसेच पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरी केंद्रांनाही जोडणी उपलब्ध करून दिली आहे
२०२५ मध्ये फ्लाय९१ ही भारतातील पहिली प्रादेशिक विमानसेवा ठरली जिने एकाच वेळी दोन ATR 72-600 विमानांची ऑर्डर दिली, ज्यामुळे देशांतर्गत प्रादेशिक विमानवाहतूक क्षेत्रात प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आला.


