Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीतासगाव पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे यांची आत्महत्या

तासगाव पोलीस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे यांची आत्महत्या

ब्रेकिंग ..!

पुणे येथे विष प्राशन करून जीवन संपवले : आत्महत्येचे कारण अस्पष्ट..

पोलीस दलात अधिकारी म्हणून घडण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका तरुण अधिकाऱ्याने आपले आयुष्य अकाली संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज मराठे यांनी आज सकाळी पुणे येथे विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पोलीस दलासह सर्वत्र शोककळा पसरली आहे. 

 याबाबत माहिती अशी : आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील सुरज मराठे हे नुकतेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत रुजू झाले होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षण घेत होते. कर्तव्यनिष्ठ, शांत आणि अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

सुरज मराठे हे अविवाहित होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ते रजेवर होते.

आज सकाळी त्यांनी अचानक विष प्राशन करून आयुष्याला पूर्णविराम दिला. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसले, तरी या घटनेने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत.

     ही बातमी समजताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. एका होतकरू अधिकाऱ्याचे असे अकाली जाणे, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अंतर्मुख करणारी घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे:

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!