कुडाळ
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी दुसर्या दिवशीही एकाही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाही. दुसर्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी 23 तर पंचायत समितीसाठी 28 अशा एकूण 51 जणांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेसाठी 28 आणि पंचायत समितीसाठी 37 अशा एकूण 65 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली.
आंब्रड जि.प. साठी सिया प्रथमेश तेली (कणकवली, शिंदे शिवसेना) व दीपलक्ष्मी सुशांत पडते (कुडाळ, शिंदे शिवसेना), पावशी जि.प.साठी जयेश नारायण चिंचळकर (डिगस, भाजप), भानुदास सुर्यकांत राणे (डिगस, अपक्ष), अरविंद मधुकर करलकर (बांव, शिंदे शिवसेना), तानाजी यदुवीर पालव (हुमरमळा,अपक्ष), सिद्धेश शंकर परब (बांबुळी, शिंदे शिवसेना), शंकर राजाराम परब (बांबुळी,अपक्ष), पिंगुळी जि.प.साठी तन्मय विश्वास वालावलकर (पिंगुळी, भाजप), विनायक देऊ राणे (गुढीपूर, शिंदे शिवसेना), पावशी व वेताळबांबर्डे जि.प.साठी प्राजक्त पंढरी चव्हाण (निरूखे, अपक्ष), नेरूर देऊळवाडा जि.प.साठी संजय धोंडदेव पडते (कुडाळ, शिंदे शिवसेना), घावनळे जि.प.साठी सखाराम चंद्रकांत खोचरे (घावनळे, ठाकरे शिवसेना), केशव (दीपक) रमेश नारकर (नारूर, शिंदे शिवसेना)-दोन अर्ज, आनंद नारायण मेस्त्री (वाडोस, अपक्ष) – दोन अर्ज, वेताळबांबर्डे जि.प.साठी नागेश नारायण आईर (रांगणा तुळसुली, शिंदे शिवसेना) – दोन अर्ज, व स्वरूपानंद प्रकाश वाळके (कडावल, शिंदे शिवसेना), माणगाव जि.प.साठी दिपक जयराम काणेकर (माणगाव, भाजप)-दोन अर्ज यांनी उमेदवारी अर्ज घेतले.
डिगस पं.स. साठी बुद्धनाथ मच्छिंद्रनाथ गोसावी (डिगस, शिंदे शिवसेना) – दोन अर्ज, निखील नित्यानंद कांदळगावकर (डिगस, शिंदे शिवसेना), नारायण (आपा) सुरेंद्र मांजरेकर (अणाव, ठाकरे शिवसेना)-दोन अर्ज, लिलाधर शंकर अणावकर (अणाव, ठाकरे शिवसेना), अनंत (राजेश) बाबुराव टंगसाळी (पणदूर, ठाकरे शिवसेना), सदानंद बाळकृष्ण अणावकर (अणाव, शिंदे शिवसेना), झाराप पं.स.साठी अश्पाक युसुफ कुडाळकर (झाराप, ठाकरे शिवसेना)-दोन अर्ज, अच्युत राजेंद्र तेंडोलकर (झाराप, शिंदे शिवसेना)-दोन अर्ज, हेमंत यशवंत भगत (आकेरी, शिंदे शिवसेना), साळगाव पं.स.साठी धिरेंद्र रमाकांत चव्हाण (आंबडपाल, अपक्ष), रोहित हंसराज सावंत (घावनळे, ठाकरे शिवसेना), मिलिंद वसंत नाईक (तुळसुली, शिंदे शिवसेना), दिनेश राजाराम साळगांवकर (साळगाव, शिंदे शिवसेना), घावनळे पं.स.साठी सोनिया संतोष मुंज (घावनळे, ठाकरे शिवसेना) व संजना संदिप म्हाडगुत (वाडोस, शिंदे शिवसेना महायुती), जांभवडे पं.स.साठी बाळकृष्ण विष्णू मडव (जांभवडे, शिंदे शिवसेना)-दोन अर्ज, आंब्रड पं.स.साठी योगेश सुभाष घाडी (भडगाव, शिंदे शिवसेना) व प्रितेश सातू गुरव (भडगाव, शिंदे शिवसेना), नेरूर दक्षिण पं.स.साठी रश्मी देवेंद्र नाईक (चेंदवण, शिंदे शिवसेना), वेताळबांबर्डे पं.स.साठी अश्विनी उदय सावंत (हिर्लोक, शिंदे शिवसेना)-दोन अर्ज, कसाल पं.स.साठी संजय हनुमंत आयरे (गावराई, अपक्ष) व नेरूर उत्तर पं.स.साठी निता भास्कर नाईक (नेरूरपार,शिंदे शिवसेना) यांनी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहीती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, नायब तहसीलदार संजय गवस तसेच निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव हे काम पाहत आहेत.


