त्यांचा तो खर्डा आवाज आज पुन्हा कानात घुमला..
राज्याचे धुरंदर नेते अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी आली आणि दादांचा तो खर्डा आवाज पुन्हा एकदा कानात घुमायला लागला
ना ओळख ना पाळख
दादा आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले पत्रकार आहोत अशी फक्त ओळख करून देण्याची फुरसत या बसा आज माझ्या समवेत पाहुणचार करायचा हे दादांचे शब्द आणि त्यांच्या समवेत अवघ्या पंधरा-वीस मिनिटांच्या झालेल्या गप्पा टप्पा त्यांचा तो खर्डा आवाज आज पुन्हा एकदा कानात घुमायला लागला.. ते सोडून गेल्याचे वृत्त समजताच निशब्द व्हायला झालं विश्वास बसणार नाही अशी बातमी आली आणि दादांच्या त्या सहवासातील आठवणी जाग्या झाल्या कुडाळ-मालवणचे माजी आम. वैभव नाईक यांनी नागपूर येथील अधिवेशनात कुडाळ मधील पत्रकारांना नेलं होतं त्यावेळी भाजप शिवसेनेची सत्ता राज्यात होती आणि दादा विरोधी पक्षात होते.. अधिवेशनाच्या वेळी अजितदादा यांना भेटण्याची आम्हाला संधी मिळाली आम्ही सर्व पत्रकार त्यांना भेटलो आणि सिंधुदुर्गातून आलो असे सांगितले या बसा असे सांगत त्यांनी आम्हा सर्वांना आपल्या समवेत बसवले स्वतःच आम्हाला बोलत केलं सिंधुदुर्गात कसं काय चाललं विचारलं अवघ्या दहा पंधरावीस मिनिटांचा तो सहवास.. दादांचा तो खर्डा आवाज त्यांचा तो स्पष्टवक्तेपणा.. उत्साह देणारा ठरला.. दादांनी चहा नाश्ता मागवला किती दिवस मुक्काम असेही विचारलं माझ्याबरोबर पाहुणचार घ्यायचा असेही आग्रहपूर्वक सांगितलं.. मुंबई येथील अधिवेशनातही त्यांची भेट झाली होती त्यावेळी त्यांनी असं आमचं आदरातीथ्थ केलं होतं त्यांची रोखठोक भूमिका याबद्दलही आम्ही पत्रकार त्यांच्याबद्दल बोललो त्यावर त्यानीस्मितहास्य केलं आज दादांच्या निधनाची बातमी समजली आणि आता त्यांचा तो खर्डा आवाज पुन्हा एकदा कानात घुमू लागला.. आता फक्त त्यांचा तो आवाजच कानात कायम राहील
अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
|र|वी|गा|व|डे|
|दै|र|त्ना|गि|री|टा|इ|म्स|


