कुडाळ,28
भावपूर्ण श्रद्धांजली
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लहान थोरांचे सर्वांचे दादा सन्माननीय अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे एक कर्तव्यदक्ष स्पष्ट वक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व आपण गमावले आहे 1982 पासून राजकारणात पदार्पण केल्यानंतर जो माणूस कधीही थांबला नाही असं निर्भीड प्रशासकी यंत्रणेवर वचक असलेला नेता हरपला त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी घेतलेला ठाम निर्णय विकासभिमुख दृष्टिकोन आणि प्रशासनातील योगदान कायम स्मरणात राहील त्यांच्या जाण्याने सार्वजनिक व राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली,
*अमित सामंत*
*अध्यक्ष ,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी*


