Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीभाजपा युवा नेते राजू राऊळ यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणी जागवीत वाहीली...

भाजपा युवा नेते राजू राऊळ यांनी अजितदादा पवार यांच्या आठवणी जागवीत वाहीली श्रद्धांजली…

सिंधुदुर्ग,

देवगडचे माजी आम.( कै)आप्पा गोगटे मुंबईवरून देवगड मध्ये पोहोचेपर्यंत देवगड नदीचा गाळ काढण्यास सुरुवात झाली आणि आणि देवगडच्या नळ पाणी योजना पाणी आले हे अजितदादा पवार यांनी करून दाखवले अशा आठवणी जागवीत भाजपाचे युवा नेते राजू राऊळ यांनी अजितदादा पवारांच्या निधनाची श्रद्धांजली वाहिली

राजू राऊळ यांनी सांगितले की देवगड नळ पाणी योजनेसाठी नदीतला गाळ काढण्याचा प्रस्ताव होता वारंवार अर्ज विनंती देऊनही गाळ काढला जात नव्हता प्रशासन टाळाटाळ करीत होते तेव्हा देवगडचे माजी आमदार आप्पा गोगटे यांनी थेट मंत्रालयात त्यावेळी अजित दादांचे दालन गाठले त्यांच्या समवेत मी होतो आप्पासाहेब दालनात पोहतताच त्यानी थेट जमिनीवर बसकण घातली आप्पासाहेब अचानक जमिनीवर बसल्याचे पाहताच अजित दादाही आपल्या खुर्चीवरून ताडकन उठले आणि आप्पा जवळ गेले आणि त्यांना खुर्चीवर बसायची विनंती केली आप्पानी ती ऐकली नाही आप्पा तुम्ही खुर्चीवर या नाहीतर मी तुमच्या समवेत खाली बसेन.. फक्त सांगितलं नाही तर आप्पा जमिनीवर त्यांच्या समवेत अजित दादा ही जमिनीवर खाली बसले तेव्हा आप्पांनी अजितदादांची विनंती मान्य करून खुर्चीवर बसले आप्पा तुमचा एवढेच काम आहे ना असं त्यांनी विचारलं तुम्ही देवगडला जाईपर्यंत तुमचं काम सुरू होईल असा शब्द अजितदादांनी आप्पांना दिला आप्पा देवगडला यायला निघाले आणि अवघ्या दोन दिवसात गाळ करण्याच्या कामाला सुरुवात झाली

अशा आठवणीना उजाळा देत भाजपा युवा नेते राजू राऊळ यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहिली

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!