Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीखासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी

🔹 इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत l अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

🔹 कणकवलीत भेट घेऊन युवकांकडून राणेंचे आभार व्यक्त

🔹 आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत तातडीने आणले भारतात 

 

कणकवली;

इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण राणे यांच्या प्रयत्नातून सुखरूप भारतात घरी आणण्यात आले आहे. या बोटीवर मालवण तालुक्यातील दांडी येथील प्रतीक प्रवीण खोचरेकर हा 23 वर्षे युवक अडकला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी खासदार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना लक्षात आणून दिली होती.त्यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखून खा.नारायण राणे यांनी आपल्या भारतीय नाविक सेना युनियनचे जनरल सेक्रेटरी सुरेश साळसकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवून प्रत्यक्ष त्या कंपनीतील अधिकाऱ्यांबरोबर आणि इराण,इराक,आणि इस्रायल येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून भारतीय दूतावासाशी संपर्क साधून या सर्व अकरा कर्मचाऱ्यांना देशात आणले. आज प्रतीक खोचरेकर या युवकाने खासदार नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले. 

इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यावर हॉर्मुझ समुद्रधुनीत प्रत्येक खोचरे कर हा युवक अडकला त्याच्या समवेत राज्यातील 11 मराठी तरुण अडकले याबाबतची माहिती मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय साळगावकर मायकल फर्नांडिस यांनी प्रतीक च्या आई-वडिलांसमवेत खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून खासदार नारायण राणे यांनी दिल्ली स्तरावर चक्र फिरवली भारतीय नाविक युनियन चे पदाधिकारी यांना या कामात जबाबदारी दिले आणि स्वतः प्रमुख अधिकाऱ्यांचे दोन्ही देशातील प्रमुख नेत्यांशी बोलून चर्चा करून या अकरावी अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप मायदेशी आणले. याबद्दल खासदार नारायण राणे यांचे आभार सर्व कुटुंबियांकडून व्यक्त केले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!