Tuesday, June 23, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळअखेर घोटगे गावातील “त्या” पुलाचे काम सुरू 

अखेर घोटगे गावातील “त्या” पुलाचे काम सुरू 

आमदार निलेश राणे यांनी तत्काळ पूल दुरुस्तीचे दिले होते आदेश 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

    कुडाळ तालुक्यातील मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे या मुख्य मार्गावरील घोटगे ग्रामपंचायतनजीक असलेला छोटा पूल एका बाजूने ढासळला होता. यामुळे घोटगे गावातील नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागणार होता. मात्र, याबाबत कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी याविषयी तत्काळ दखल घेत या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश दिले. या पुलाच्या ढासळलेल्या बाजूचे काम आज युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून यामुळे घोटगे गावातील नागरिकांची समस्या दूर झाली आहे. या प्रकरणी घोटगे सरपंच चैताली ढवळ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, माजी ग्रामपंचायत सदस्य चेतन ढवळ यांनी महत्वपूर्ण पाठपुरावा केला. 

   कुडाळ-घोटगे मुख्य मार्गावरील हा पूल वाहतूक आणि नागरिकांच्या येण्याजाण्यासाठी धोकादायक बनला होता. मात्र, आमदार निलेश राणे यांनी तत्काळ याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला. यामुळे घोटगेवासियांची समस्या दूर झाली आहे. आमदार निलेश राणे यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेबाबत गावच्या सरपंच चैताली ढवळ, उपसरपंच रमाकांत कोरगावकर, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मडव, गणेश बुटाले, उमेश रायकर, ओमकार ढवळ, तुकाराम शिंदे, दीपक मोरये, कमलेश कोरगांवकर, विजय नाईक, शरद कोरगांवकर, गोविंदा पावसकर, पप्पू ढवळ, सुधीर नाईक, चिंतामणी पेडणेकर यांनी नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!