Sunday, July 12, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ मान्सून मॅरेथॉन ३ पर्वात २१ किमी पुरूष प्रथम बेळगावचा प्रथमेश परमकर...

कुडाळ मान्सून मॅरेथॉन ३ पर्वात २१ किमी पुरूष प्रथम बेळगावचा प्रथमेश परमकर व महिला प्रथम आरती शहा

१६ किमी पुरूष प्रथम मुंबईचा निलेश आर्डेकर व महिला प्रथम गडहिंग्जलजची ममता पाटील

 

केनियाचा आंतरराष्ट्रिय धावपटू विल्सन किपरॉपची विशेष उपस्थिती प्रेरणादायी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

 

*कुडाळ* (प्रतिनिधी)-

राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ आयोजित कुडाळ मान्सून रन ३ पर्वात २१ किमी पुरूष गटात बेळगावचा प्रथमेश करमरकर पहिला व महिला गटात बेळगावची आरती शहा पहिली तर १६ किमी पुरूष प्रथम मुंबईचा निलेश आर्डेकर व महिलामध्ये गडहिंग्लजची ममता पाटील, १० किमी पुरूष प्रथम कोल्हापूरचा तेजस सोनवणे व महिला प्रथम धारवाड कर्नाटकची विजयालक्ष्मी विजेते झाले. विशेष उपस्थिती केनियाचा आंतरराष्ट्रिय धावपटू विल्सन केपरॉप या मॅरेथॉन प्रेरणादायी आहे असे उद्घाटननिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक नयोमी साटम, जिल्हा परिवहन अधिकारी काळे, राणे हॉस्पिटलचे डॉ. जी. टी. राणे, डॉ. सई राणे, अजित राणे, मिलन राणे, बॅ नाथ पै चे उमेश गाळवणकर, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजित राणे, सचिव तेंडोलकर, बाळा कदम, टीम केएमआरचे गजानन कांदळगावकर, रूपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, राज वारंग, शक्ति देसाई, डॉ. प्रशांत मडव, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. जयसिंग रावराणे, अमृता गाळवणकर, माजी आमदार वैभव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अमित सामंत, केदार सामंत, रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष मकरंद नाईक, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, ॲड. नकुल पार्सेकर, संध्या तेर्से, ओंकार तेली, विनायक राणे, निलेश परब, बंड्या सावंत, निवेदक सचिन मदने व प्रिया मार्कडे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!