Wednesday, July 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य सेवा सप्ताहाचा शुभारंभ; आमदार दीपक केसरकर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य सेवा सप्ताहाचा शुभारंभ; आमदार दीपक केसरकर यांचे मार्गदर्शन

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन

 

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या रुंग्णाला गोवा किंवा बेळगाव इथल्या रुंग्णालयांमध्ये पाठवावे लागणार नाही याची दक्षता डीन आणि त्यांचे सहकारी डॉक्टर्स आणि तमाम कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे कळकळीचे आवाहन माजी मंत्री, सावंतवाडीचे शिंदे सेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केले.

          राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. अजित दादा पवार यांच्या 

स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य सेवा सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी केसरकर बोलत होते.

              सर्वसामान्य जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वोत्तम सेवा आहे या सेवेचा लाभ देण्याचे काम वैद्यकीय महाविद्यालयातर्फे होत आहे हीच कै. अजित दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन केसरकर यांनी यावेळी बोलतांना केले.

              वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभागात आयोजित करण्यात आलेल्या या छोटेखानी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित दादा गट ), जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, ज्येष्ठ नेते सावळाराम आणावकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत ओरोसचे मंडल अध्यक्ष भाई सावंत, ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे हार्दिक शिगले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अनंत डवंगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, सर्व प्राध्यापक वर्ग, डॉक्टर्स विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            सुरुवातीला दीप प्रज्वलन करून तसेच कै. दादांच्या फोटोला पुष्पहार घालून शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.

           आपल्या भाषणात आमदार केसरकर यांन आरोग्य सेवेचे महत्व, समाजाभिमुख वैद्यकीय सेवा आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा पोहोचविण्याची गरज यावर मार्गदर्शन केले.

            वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुंग्णालय आणि आरोग्य यंत्रनेणे संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारची शिबीरे भरवून लोकांना सेवा उपलब्ध करुन द्यावी अशी सूचना करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

                भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावळाराम 

अणावकर,डॉ. श्रीपाद पाटील यांचीही यावेळी भाषणे झाली.

               डीन डॉ.डवंगे यांनी सेवा साप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

              आरोग्य सेवा सप्ताहाच्या माध्यमातून जनजागृती, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आरोग्य क्षेत्रात अधिक सक्षम आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासू नये आणि रक्त सहज उपलब्ध व्हावे यासाठी रक्तदान शिबीरे भरविण्यात येणार असून या उपक्रमाला सिंधुदुर्गवासियांनी जिल्हा रुंग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला सक्रीय साथ द्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि डीन डॉ. अनंत डवंगे यांनी सिंधुदुर्ग वासियांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!