Wednesday, July 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळयसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने कुडाळ येथे अनुसूचित जाती...

यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने कुडाळ येथे अनुसूचित जाती वृद्ध कलावंत मेळावाचे आयोजन…

कुडाळ | प्रतिनिधी 

ढोल ताशा सनई कोकणातील समृद्ध कला असून या कलावंतांना राजश्री शाहू महाराज कलावंत मानधन योजना मिळावी म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीला पत्र काढून अशा कलावंतांचे प्रस्ताव तात्काळ द्या असे निर्देश दिले जातील असे सभापती मिलिंद नाईक यांनी सांगून पारंपारिक कलावंतांच्या मागे खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे सदैव उभे असतात असे त्यांनी यावेळी सांगितले. यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

यसार सोशल फाउंडेशन व संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने कुडाळ येथे अनुसूचित जाती वृद्ध कलावंत मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, कुडाळ गटविकास अधिकारी श्री मनोज भोगटे, यसार सोशल फाउंडेशनचे संस्थापक श्री सत्यवान तेंडोलकर , संविधानिक हितकारणी महासंघ अध्यक्ष महेश परुळेकर , माजी सभापती अंकुश जाधव , माजी नगरसेवक गौतम खुडकर , भारतीय बौद्ध महासभेचे माजी जेष्ठ कायकर्ते श्री जनीकुमार कांबळे , भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष निलेश जाधव , समतादूत सगुण जाधव, कुडाळ नगरसेवक विलास कुडाळकर , ज्येष्ठ दशावतार कलावंत प्रकाश तांबे, सुधीर अणावकर, झाराप उपसरपंच मंगेश गावकर, विनोद जाधव, चंद्रकांत वालावलकर, तरंदळे संरपंच सुशिल कदम, केशव जाधव, इकिगाई फाउंडेशन दिपक जाधव, पत्रकार रेवती वालावलकर, उत्कर्ष कार्यकारी मंडळ अध्यक्ष उदय आडेलकर , यसार फाउंडेशन उपाध्यक्ष वामन बांबार्डेकर, यसार फाउंडेशन कोषाध्यक्ष रमाकांत जाधव, अमोल पावसकर , नंदिनी पिंगुळकर , साक्षी चेंदवणकर , प्राजक्ता नेमळेकर , महीमा कदम , मयुरी जाधव सामाजिक कार्यकर्ते वासुदेव जाधव उपस्थित होते.

हा मेळावा घेण्यामागे उद्देश म्हणजे अनुसूचित जाती मधील कलावंतांचे प्रस्ताव शासन दरबारी जात नाही आणि त्यामुळे या वृद्ध कलावंतांना मानधन मिळत नाही हे प्रस्ताव शासन दरबारी जावेत त्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते मिळाव्यामध्ये सभापती मिलिंद नाईक यांनी सांगितले की ढोल ताशे सनई वादन करणाऱ्या कलावंतांचे प्रस्ताव येत नाहीत हे प्रस्ताव यावेत म्हणून आम्ही प्रत्येक ग्रामसेवकाला पत्र काढून या कलावंतांचे प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्देश देणार आहोत ही कला पारंपारिक कला आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे असे त्यांनी सांगितले तर संविधानिक हितकारणी महासंघाचे अध्यक्ष महेश कोळवेकर यांनी सांगितले की सर्वात प्राचीन लोककला असून सुद्धा याला राजाश्रय मिळालेला नाही प्रत्येक सण उत्सवामध्ये ही कला सादर केली जाते केवळ वंचित समूहातील लोक वाजवत असल्याने या कलेला मानसन्मान नाही महासंघ या कलाकारांच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले. तर यसार फाउंडेशनचे संस्थापक सत्यवान तेंडोलकर यांनी सांगितले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन यसार फाउंडेशनच्या वतीने जनजागृती केली जाईल आणि कलावंतांचे प्रस्ताव केले जातील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय आडेलकर यांनी केले तर आभार चंद्रकांत वालावलकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!