Friday, September 4, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीविभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांची पावशी ढवणवाडी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रास...

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांची पावशी ढवणवाडी प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रास भेट

कुडाळ | प्रतिनिधी 

कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी कुडाळ तालुक्यातील पावशी ढवणवाडी येथील मतदान केंद्राला भेट देऊन विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची क्षेत्रीय पाहणी केली.

यावेळी त्यांनी मतदान केंद्रावरील मतदार यादी, उपलब्ध सुविधा तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या विविध कार्यवाहीची माहिती घेतली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून मतदार यादी अधिक अचूक व निर्दोष करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला.

याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, कुडाळ उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे, कुडाळ तहसीलदार सचिन पाटील तसेच सरपंच वैशाली पावसकर, ग्रामपंचायत सदस्य वृणाल कुंभार, नयना तवटे, ग्रामपंचायत अधिकारी डी.एस. चव्हाण, बीएलओ गंगाराम पारकर, पोलिस पाटील शेखर शेलटे, तलाठी लता पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!