Tuesday, September 29, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळमाझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे - आमदार निलेश...

माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे – आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी 

 

माझ्या जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर खेळताना पाहायचे आहे आणि त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी निर्माण करणे हे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे कबड्डी असोसिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या गरजा आणि आवश्यक पायाभूत सुविधा काय असल्या पाहिजे यासाठी एकत्र येण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे करून लवकरच या संदर्भात एकत्रित बैठक घेऊन आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहित कसे करता येईल याकडे लक्ष देण्याचे प्रयत्न करूया असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व आमदार निलेश राणे यांच्या सहकार्याने कुडाळ हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या आयोजनाखाली कुडाळ हायस्कूलच्या मैदानामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्य पदासाठी कुमारी गटातील विद्यार्थिनींसाठी निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या निवड चाचणी मधील खेळाडूंना राज्यस्तरावर खेळता येणार आहे या निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सहकार्यवाह अनंत वैद्य, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक रंजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभिषेक गावडे, कबड्डी फेडरेशनचे तुषार साळगावकर, नगरसेवक विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर, रेवती राणे आदी उपस्थित होते. 

 

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबत इच्छा निर्माण झाली पाहिजे खेळ हे महत्त्वाचे आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले पाहिजे आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या उपलब्ध करणे गरजेचे आहे कबड्डी सारख्या खेळाला आपण अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी कबड्डी फेडरेशन किंवा असोसिएशनने पुढाकार घेतला पाहिजे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या सोबत असू पण तुम्ही आमच्या जवळ या खेळासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत बोलला नाही तर त्या कशा समजणार असा प्रश्न उपस्थित करून लवकरच या संदर्भात आपण बैठक घेऊन खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सुविधा पुरवण्यासाठी वैयक्तिक किंवा शासन स्तरावरून मदत करण्यासाठी प्रयत्न करू असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

 

छाया प्रथमेश जाधव

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!