सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आणि कंत्राटी शिक्षक भरतीसह अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होणाऱ्या शासन निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला या मोर्चामध्ये शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवून सुमारे ३ हजार ५०० शिक्षक सहभागी झाले होते.
सरकारने प्राथमिक शिक्षक व शाळांबाबत घेतलेल्या निर्णयान विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा येथील श्री देव रवळनाथ मंदिर या ठिकाणाहून सुरू झाला तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला या मोर्चाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडविले त्यानंतर शासनाच्या विरोधात शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी केली शासनाच्या विरोधात हल्लाबोल…. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजेत…. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे…… कोण म्हणतो देणार नाही….. घेतल्याशिवाय राहणार नाही….. अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोडले यामध्ये प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक राज्य पदवीधर प्राथमिक, शिक्षक व केंद्रप्रमुख, संघटना जुनी पेन्शन हक्क संघटना, कास्ट्राईब प्राथमिक शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, राज्य केंद्रप्रमुख संघ, केंद्रप्रमुख समन्वय समिती, उर्दू शिक्षक संघटना आधी शिक्षक संघटना या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
