श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दि. ३ ऑक्टोंबर पासून होणार सुरू

0

 

कुडाळ | प्रतिनिधी 

श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी कै. ॲड. अभय देसाई स्मृती ४९ वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा बुधवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार ११ ऑक्टोंबर रोजी श्री देव कुडाळेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. 

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये, तृतीय क्रमांकास ७ हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ५ हजार रुपये, पाचव्या क्रमांकास २ हजार ५०० रुपये अशी बक्षिसे असून वैयक्तिक बक्षीसे सुद्धा देण्यात येणार आहेत. भजन स्पर्धेचे अर्ज किशोर काणेकर, कुडाळ बाजारपेठ येथे मंगळवार १ ऑक्टोंबर पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी महेश कुडाळकर मोबाईल नं. (९४२०२१००२०) येथे संपर्क साधावा. यावर्षी या भजन स्पर्धेचे ४९ वर्ष असल्याने स्पर्धकांसह भजन प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.