कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ पोलीस ठाणे येथे होणाऱ्या ऐतिहासिक बारीचे उद्घाटन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावर्षी डबलबारीचे ७७ वे वर्ष आहे पारंपारिक डबलबारी म्हणून अजूनही या डबलबारीचा नावलौकिक आहे. या बारीसाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती.
कुडाळ पोलीस ठाणे येथे २१ दिवसांच्या गणरायाची सेवा केली जाते गणरायाच्या २० व्या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि त्यानिमित्ताने डबलबारी भजनाचे आयोजन केले जाते. यावर्षी या पारंपारिक डबलबारी मध्ये भजनी बुवा गणेश जांभळे यांच्या विरुद्ध भजनी बुवा अरुण घाडी अशी भारी आयोजित करण्यात आली या डबलबारीचे उद्घाटन श्रीफळ वाढवून झाले यावेळी वकील राजू बिले, सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट, राजेश महाडेश्वर तसेच पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते या उद्घाटनाचे सूत्रसंचालन तेंडुलकर यांनी केले ही बारी ऐकण्यासाठी श्रोत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
