कुडाळ | प्रतिनिधी
महायुती सरकारने कुडाळ नगरपंचायतीसाठी अग्निशमन बुलेट मोटरसायकल दिली आहे. या अग्निशमन मोटरसायकलचे कुडाळ नगरपंचायतीच्या भाजप नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केले.
महायुती सरकारने प्रत्येक नगरपंचायतीसाठी बुलेट फायर मोटरसायकल दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीलासुद्धा ही मोटर सायकल देण्यात आली आहे. ही मोटरसायकल भाजपच्या नगरसेवकांनी व्यापारी प्रसाद धडाम यांच्या यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण केली. यावेळी भाजपाचे गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, ॲड. राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, नगरसेवक गणेश भोगटे तसेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भाजपचे गटनेते विलास कुडाळकर यांनी सांगितले की, महायुती सरकारने ही सेवा नागरिकांसाठी दिली आहे ज्या ठिकाणी अग्निशामन दलाची मोठी गाडी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी या मोटार सायकलच्या माध्यमातून आग आटोक्यात आणणें सोयीचे होणार आहे. ही मोटरसायकल दिल्याबद्दल महायुतीतील सर्व नेत्यांसह खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
