बारामती येथील घटना
पुणे | वृत्तसेवा
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या दारात किरकोळ कारणावरुन एका युवकाच्या पोटात चाकूने भोसकून खून केल्याचा धक्कादायक समोर आला आहे. यामुळे बारामतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अर्थव पोळ (वय १७) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. अर्थव पोळ हा बारावीत शिकत होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी सी कॉलेजच्या बाहेर सर्व विद्यार्थी जमले होते. त्यावेळी अर्थव पोळ व त्याच्याच वर्गात शिकणार्या आरोपीमध्ये वाद झाला. एक महिन्यांपूर्वी दुचाकीला कट मारण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यात एकमेकांना पाहून घेण्याची भाषा झाली. तेव्हा आरोपींनी चाकू काढून अर्थव पोळ याच्यावर सपासप वार केले. अर्थव रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर दोघेही आरोपी पळून गेले. त्यानंतर अर्थव याला सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात आणण्यात आले. पण डॉक्टर तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला होता. या प्रकाराने बारामती शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
