Tuesday, November 11, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हादेवगडजामसंडे तरवाडी येथे सापडली १ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी

जामसंडे तरवाडी येथे सापडली १ कोटी रूपये किंमतीची व्हेल माशाची उलटी

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई 

जामसंडे तरवाडी येथील एकावर गुन्हा दाखल

देवगड | प्रतिनिधी

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुमारे १ कोटी रूपये किंमतीचा व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ ताब्यात घेतला आहे.हा पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी तेथीलच सुबोध रामचंद्र होडावडेकर(५६) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.५० वा.सुमारास केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, जामसंडे तरवाडी येथील सुबोध होडावडेकर याच्याकडे व्हेल माशाची उलटीसदृश पदार्थ असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती.त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरिक्षक समीर भोसले, पो.उपनिरिक्षक शेळके, स.पो. उपनिरिक्षक कोयंडे,पोलिस हवालदार काळसेकर, जामदार, देसाई, पो.नाईक पालकर, तेली, महिला पो.हे.कॉ.गवस, पो.कॉ. आरमारकर, सरमळकर आदींनी सोमवारी ३० सप्टेंबर रोजी रात्री ८.५० वा.सुमारास जामसंडे तरवाडी येथे छापा टाकून सुबोध होडावडेकर यांनी लालसर गुलाबी रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेले व्हेल माशाच्या उलटीसदृश पदार्थाचे गोळे ताब्यात घेतले.हे किलो वजनाचे असून किमंत सुमारे एक कोटी रूपये आहे.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.व्हेल माशाचा उलटीसदृश पदार्थ गैरकायदा, बिगरपरवाना विक्री करण्याचा उद्देशाने जवळ बाळगल्याप्रकरणी सुबोध होडावडेकर याच्याविरूध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४२,४३,४४,४८,५१ अन्वये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा तपास पो.हे.कॉ.उदय शिरगावकर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!