कुडाळ | प्रतिनिधी
स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत कुडाळ नगरपंचायत येथे सफाई मित्रांचा सत्कार व वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरपंचायत येथे महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर स्वच्छता की भागीदारी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत स्वच्छता ही सेवा या माध्यमातून कुडाळ नगरपंचायत मध्ये सफाई काम करणाऱ्या मित्रांचा सत्कार करण्यात आला तसेच नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब उदय मांजरेकर, नगरसेविका चांदणी कांबळी, मुख्याधिकारी अरविंद नातू, स्वच्छता विभागाचे संदीप कोरगावकर, सिद्धेश ठाकूर, मुकादम दीपक कदम तसेच सफाई मित्र आदी उपस्थित होते यावेळी सफाई मित्रांना सफाईसाठी आवश्यक असणारे साहित्य वाटप करण्यात आले.
