कुडाळ | प्रतिनिधी
जांभवडे हायस्कूलजवळ एस. टी. न थांबवल्यामुळे माध्यमिक शिक्षण समिती जांभवडे पंचक्रोशीचे अध्यक्ष सुभाष मडव यांनी एस. टी. बस रोखून विद्यार्थ्यासह तीव्र आंदोलन केले.
घोटगे (दुर्गानगर) कुडाळ एस. टी., शालेय पासधारक विद्यार्थी शाळा संपल्यानंतर घरी जाण्यासाठी बस स्थानकावर गाडीसाठी उभे असताना एस. टी. वाहनचालकाने एस. टी. न थांबवता भरधाव वेगाने पुढे घेऊन गेला. ती एस. टी. श्री. भगवती मंदिराजवळ संस्था अध्यक्ष श्री. सुभाष मडव यांनी अडवली, त्यावेळी जांभवडे गावचे सरपंच श्री. अमित मडव, श्री मनोहर गावकर, मुख्याध्यापक श्री. अनिल कासले, श्री. पंढरीनाथ मडव, श्री शंकर मडव, श्री. दत्ताराम मडव, श्री. प्रमोद मडव, श्री. प्रशांत माळकर, श्री. सुशांत मडव, श्री. संजय चव्हाण सर, श्री. संजय मडव, श्री. विजय राउळ, उमेश सावंत, राऊत, करंदीकर, दळवी, कुडाळकर, पुजारी, मेस्त्री , पाटील, बागुल, काटकर, खरात, कदम, विठोबा ठाकर ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमन श्री. सुभाष मडव यांनी चालकाला एस. टी. न थांबविल्याबद्दल जाब विचारला असता चालकाने अरेरावीची उत्तरे दिली. त्यानंतर तालुका व जिल्हा स्तरावर संबंधीत अधिकाऱ्याना झालेला सर्व प्रकार कानावर घातला व ग्रामीण विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली व चालकालावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. व यानंतर असा प्रकार आमच्याकडून होणार नाही याची ग्वाही दिली. तदनंतर चालकाने एस. टी. परत हायस्कूलकडे घेऊन गेला. सर्व विद्यार्थ्याना घेऊन एस. टी. कुडाळकडे रवाना झाली. हायस्कूलचे विद्यार्थी कुडाळ डेपोचे पासधारक आहेत.
तरी पुढे अशाप्रकारचा विद्यार्थ्याना नाहक त्रास झाल्यास जांभवडे पंचक्रोशीतील संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे सुभाष मडव यांनी सांगितले.
