जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग व रेड रिबन क्लब, संत राऊळ महाराज महाविद्यालय यांचा संयुक्त उपक्रम
कुडाळ | प्रतिनिधी
संत राऊळ महाराज महाविद्यालयातील रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ बस स्थानक तसेच कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांव्दारे एड्स जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील रेड रिबन क्लब च्या प्रथम वर्ष विज्ञान विभागाचे एकूण २५ स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाले होते. या पथनाट्या दरम्यान प्रथमच नियंत्रण कक्षातून अशा प्रकारचे पथनाट्य हे स्थानकात होत आहे अशी सूचना नियंत्रण प्रमुख यांच्याद्वारे करण्यात आली व यामुळे प्रवासी देखील अचंबित झाले व भारावून गेले. पथनाट्य पाहण्यासाठी अनेक चालक यांनी आपल्या गाड्या ह्या तशास थांबवून ठेवल्या व अनेक प्रवासी यांनी खिडकीतून तर अनेकांनी प्रत्यक्षदर्शनी येऊन पथनाट्याचा आस्वाद घेतले. सुमारे १० मिनिटे चाललेल्या या पथनाट्या दरम्यान स्थानक परिसरात कमालीची शांतता तसेच प्रवाशांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. सदर पथनाट्यातून एच.आय. व्ही. संक्रमण होण्याची कारणे तसेच खबरदारीचे उपाय यावर विवेचना करण्यात आली.
पथनाट्य बसवण्यासाठी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांचेकडून मुंबई तसेच दार्जिलिंग येथील प्रख्यात कोरिओग्राफर कुडाळ महाविद्यालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये श्री. गिरीश तलरेजा, मुंबई व श्री जॉर्डन थामी, मूळचे दार्जिलिंग यांनी पथनाट्या साठी विद्यार्थी यांना मोलाचे सहकार्य केले.
बस स्थानक येथे पथनाट्य सादर केल्यानंतर पुन्हा हे पथनाट्य कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सादर करण्यात आले. यासाठी हायस्कूलचे मुख्याध्यापक, ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य तसेच क. म. शि. प्र. मंडळ पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कुडाळ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.एन.लोखंडे, श्री. सुनील धोनुक्षे, जिल्हा पर्यवेक्षक, जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, श्री. मानसिंग पाटील, समुपदेशक जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व श्री. सुरेश डोंगरे, मदतनीस, जिल्हा रुग्णालय यांचे विशेष सहकार्य तसेच उपस्थिती लाभली. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. उमेश कामत व कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण हे उपस्थित होते.
