कणकवलीमध्ये निघाली आरक्षण बचाव रॅली ; आमदार नितेश राणे झाले सहभागी

0

कणकवली | वृत्तसेवा 

महायुती व आरपीआयच्या  वतीने कणकवली येथे आरक्षण बचाव रॅली काढण्यात आली या रॅलीला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. 

काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण हटवण्याच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्या नंतर जनमानसात त्याचे पडसाद उमटले या वक्तव्याचा आमदार नितेश राणे यांनी निषेध केला आणि आरक्षण बचाव रॅलीची घोषणा केली ही आरक्षण बचाव रॅली आज शनिवार कणकवली येथे काढण्यात आली काँग्रेस पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करून महाविकास आघाडी आरक्षण मुद्द्यावरून कशाप्रकारे जनसामान्यांमध्ये नकारात्मक विचार पसरले मुळात काँग्रेसचा आरक्षण विरोधाचा चेहरा दाखवण्यासाठी ही रॅली काढण्यात आली जाणवली पूल ते कणकवली बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आली यामध्ये आमदार नितेश राणेंसह भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रवक्ते अंकुश जाधव, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री सहभागी झाले होते.