Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeमहाराष्ट्रतारकर्ली, गणपतीपुळेसह एमटीडीसीच्या राज्यातील ३० पर्यटक निवासाचे होणार खाजगीकरण कर्मचाऱ्यांना नोटीसा दिल्याने...

तारकर्ली, गणपतीपुळेसह एमटीडीसीच्या राज्यातील ३० पर्यटक निवासाचे होणार खाजगीकरण कर्मचाऱ्यांना नोटीसा दिल्याने खळबळ

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी 

तारकलीसह एमटीडीसीच्या राज्यातील विविध भागातील 30 पर्यटक निवासाचे खाजगीकरण होणार असून तशा कर्मचाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या राज्याच्या विविध भागातील सुमारे ३० पर्यटक निवासाचे लवकरच खाजगीकरण होणार असल्याची माहिती समोर आली असून पर्यटन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची निविदा प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे या पर्यटक निवासात ११ महिन्याच्या कंत्राटी कामगारांना काम संपवण्याबाबतची नोटीसही देण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यात अस्वस्थता पसरली आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये अनेक वर्षापासून विविध भागातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळावर पर्यटक निवास कार्यरत आहेत यामध्ये तारकर्ली गणपतीपुळे महाबळेश्वर ताडोबा शिर्डी चिखलधारा कार्ला, भंडारदरा माळशेज घाट सिंहगड नाशिक अशा पर्यटक निवासाचे व इतर काही ठिकाणी मिळून ३० पर्यटक निवासाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या पर्यटन महामंडळाने घेतला आहे पर्यटन महामंडळ मध्ये दोन प्रकारचे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत ११ महिन्याच्या कंत्राटावरील राज्यातील ४७ कर्मचाऱ्यांचा कार्यकाल २० मे २०२४ ते १९ एप्रिल २०२५ असा आहे या सर्वांना नोटिसा देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!