ज्येष्ठ वकील संग्राम देसाई यांच्या नागरी सत्कारात.. शेरेबाजी टोलेबाजीने आली रंगत..!
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ शहरातील ज्येष्ठ वकील अँड संग्राम देसाई.. यांची महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा रविवारी झालेला नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम राजकीय शेरेबाजी टोलेबाजीने.. गाजला आणि लक्षवेधी ठरला.. दहशतवाद कधी आला गेला हे कळलेच नाही ही टाकलेली राजकीय गुगली मात्र सर्वांच्याच पसंतीस उतरली.. सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी नेते कार्यकर्ते एकत्र आल्याने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली.. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थितांचे स्वागत.. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले यावेळी त्यांनी राजकीय शैलित मिस्कीलपणे व्यासपीठावर बसलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना हळुवारपणे शब्दशैलीत चिमटा काढला आणि सुरू झाली शेरेबाजी आणि टोलेबाजी.. उपस्थितानी हास्याचे फवारे उडवीत या शेरेबाजीला टोलेबाजीला.. उस्फूर्तपणे दाद दिली उपस्थितांच्यामनातील विचार या निमित्ताने व्यक्त झाले अमित सामंत मनोगतात.. म्हणाले धन्यवाद संग्राम.. तुझ्या या नागरी सत्कारामुळे आम्हाला हे शक्य झालं.. असं उच्चारताच उपस्थितांनी कान टवकारले आणि सर्व उपस्थित कान देऊन ऐकू लागले.. त्याच मोशन मध्ये सामंत म्हणाले.. हे सर्व या नागरी सत्कारामुळे एकत्र आले यानागरी सत्कार कार्यक्रमाचा हेतूच हा होता.. की दोन भिन्न.. आणि त्यात दोन विरुद्ध विचारसरणीचे पक्ष आणि पक्षाचे नेते एकत्र यावे.. आणि हे संग्राम यांच्या सत्कारामुळेच शक्य झालं.. हे वक्तव्य ऐकताच दस्तुरखुद नारायण राणे यांनीही दाद देत.. आपला हजरजबाबीपणाचा बाणा दाखवीत अमित मी वाट बघतोय.. तुझे विचार नक्की बदलतील असं वाटतं.। त्याच हजरजबाबीपणात अमित सामंतम्हणाले.. साहेब.. फक्त एक दोन महिने थांबा विचार नक्की बदलतील पण ते विचार कुणाचे विचार बदलतील हे नक्की मी सांगू शकत नाही या त्यांच्या त्यांच्या वक्तव्यावर सभागृहात हास्याची लकेर उमटली टाळ्यांचा कडकडाट झाला.। हशा आणि टाळ्यानी.. कार्यक्रम उत्तरोत्तरंगत गेला त्याच दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची इंट्री कार्यक्रम स्थळी झाली. ना. केसरकर व्यासपीठावर येताच.. अमित सामंत यांनी टोला लगावला म्हणाले आणि बघा परत दोन विभिन्न पक्षाच्या नेत्याचे स्वागत करायला मला मिळाले हा माझ्या राजकीय दृष्टीने विलक्षण योगायोग आहे या त्यांच्या वक्तव्यावर नामदार केसरकर यांच्यासहित राणे यांनीही दाद दिली उपस्थितांनी.. टाळ्या वाजवल्या ..कार्यक्रमात माजी खा. निलेश राणे यांनीही आपल्या शैलीत चिमटे काढले संग्राम देसाई यांचे कौतुक केले संग्राम असल्यामुळे आम्हाला कशीच भीती नाही राजकीय राडे.। हाणामाऱ्या मारामाऱ्या या आम्ही संग्रामच्या जीवावर केल्या आम्हाला खात्री असते संग्राम असल्यामुळे आम्ही आत राहू शकत नाही या निलेश राणेंच्या वक्तव्यावरही उपस्थित कार्यकर्त्यांनी दिलखुलासपणे दाद दिली.. निलेश राणे यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केली आहे हाच धागा पकडून 2019 मध्ये राणे यांच्या स्वाभिमान पक्षामधून रणजीत देसाई कुडाळ मालवण मतदार संघात उभे राहिले होते .. हा धागा पकडून रणजीत तू माझ्या पाठीशी फक्त उभा रहा असे सांगताच… उपस्थितीतानीहशा टाळ्या.. मारून दाद दिली.. हलक्या फुलक्या राजकीय शेरेबाजी टोलेबाजीने कार्यक्रम रंगत गेला.. सत्कारमूर्ती संग्राम देसाई यांच्यातील युवा राजकीय नेता या भाषणाने जागा झाला आणि त्यांनीही आपण विद्यार्थी सेनेचा प्रमुख असताना आलेले अनुभव कथन केले.। पक्षांतर्गत कसे पाय ओढले जातात त्याचे किस्से राणे यांची परवानगी घेऊनच संग्राम देसाई यांनी मिस्कील पणे कथन केले .।.. देसाई आणि टाडा कलमा बाबत.. आठवण करून दिली आणि टाडापेक्षाही पुढे.. दीपक भाईच्या.. राजकीय वक्तव्याचा मिस्कीलपणे.. चिमटा काढला दहशतवाद यावर दीपकभाईनी राजकीय गदारोळ उठवला अनेकांचे धाबे दणाणले मात्र जिल्ह्यातील हा दहशतवाद केव्हाच गायब झाला हेही इतक्याच तत्परतेने ते सांगायला विसरले नाही या राजकीय चिमट्याने उपस्थित हास्यातडुबून गेले.. टाळ्याचा कडकडाट करून उस्फुर्त दात दिली
आणि आपण सत्कार घ्यायला घाबरत होतो ज्याचा सत्कार होतो त्याच्याबद्दल अनेक उलट्या सुलट्या प्रतिक्रिया दिल्या जातात त्यामुळे मी थोडा घाबरलोच मात्र माझ्या या आयुष्यात माझ्या आई-वडिलां बरोबरच नारायण राणे यांनी ची साथ दिली ती मी कधीच विसरणार नाही.. असे सांगत. संग्राम देसाई यांचा नागरिक सत्काराचा हाकार्यक्रम उत्तरोत्तर.. रंगत गेला आणि राजकीय शेरेबाजी टोलेबाजीने.. स्मरणात राहिला.
