रोटरी क्लब ऑफ कुडाळ संचलित कोटक महिंद्रा सीएसआर फंड पुरस्कृत मिळणार दोन मशिन
कुडाळ | प्रतिनिधी
सुयश हॉस्पिटल येथे रोटरी क्लब ऑफ कुडाळ संचलित कोटक महिंद्रा सीएसआर फंड पुरस्कृत डायलिसिस मशीन लोकार्पण समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सुयश हॉस्पिटल डायलिसिस सेंटर येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
रोटरी समाजात विविध स्तरावर लोकोपयोगी सेवा देत असते. रोटरी क्लब ऑफ कुडाळ व कोटक महिंद्रा सीएसआर फंड यांच्या संयुक्त विद्यमाने सुयश हॉस्पिटल डायलिसिस सेंटर या ठिकाणी नवीन दोन डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत.
डायलिसिसचे उपचार हे महागडे व नियमित घ्यावे लागतात. ही गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने या सेंटरमध्ये दोन नवीन मशीन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. समाजातील गरीब रुग्णांना या डायलिसिस सेंटर मध्ये संपूर्ण मोफत डायलिसिस सुविधा मिळत आहे. या प्रोजेक्टसाठी प्रमुख समन्वयक डॉ. अमेय देसाई मुंबई, श्री. गजेंद्र दीक्षित, कोटक महिंद्रा सीएसआर विभाग, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शरद पै, पिडीजी नासिर बोरसादवाला, रो. राजन बोभाटे आणि डॉ. संजय केसरे अध्यक्ष रोटरी क्लब कुडाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक डॉ. अमेय देसाई तसेच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शरद पै, पिडिजी नासिर बोरसादवाला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, पत्रकार शेखर सामंत, असिस्टंट गव्हर्नर रो. महादेव पाटकर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सुयश हॉस्पिटल आवारात रोटरी क्लब ऑफ कुडाळ मेडिकल बँक या विभागाचे सुद्धा अनावरण होणार आहे. गरजू रुग्णांना व्हीलचेअर, बेड, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, एअर बेड व मेडिकल इक्विपमेंट्स वापरासाठी मोफत पुरवण्यात येतील. अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय केसरे यांनी दिली. यावेळी रो. दिनेश आजगावकर, सचिव रो. राजीव पवार, खजिनदार रो. मकरंद नाईक, रो. राजनजी बोभाटे, रो. डॉ. रवींद्र जोशी, रो. शशिकांत चव्हाण, रो. अॅड. राजीव बिले, रो. सचिन मदने, रो. गजानन कांदळगावकर, रो. प्रणय तेली, रो. अभिषेक माने, रो. प्रमोद भोगटे, रो. एकनाथ पिंगुळकर, रो. अजिंक्य जामसडेकर, रो. अमित वळंजू, रो. डॉ राजवर्धन देसाई इत्यादी उपस्थित होते.
