कुडाळ | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग व नजीकच्या जिल्ह्यातील पदवीधरांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व व्योसिम टेकलॅब यांच्या समन्वयाने १० ऑक्टोंबर २०२४ रोजी जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. या जॉब फेअर चा मूळ उद्देश इच्छुक पदवीधर उमेदवार व उपलब्ध स्थानिक रोजगाराच्या संधी यातले अंतर भरून काढणे हा आहे. सदर जॉब फेअर मध्ये कंटेंट मार्केटिंग स्पेशालिस्ट, कॅम्पेन मॅनेजर, सेल्स एजंट, प्री सेल्स स्पेशलिस्ट आणि एसइओ ऍनालिस्ट अशी विविध पदे भरली जाणार आहेत. सदर संधींसाठी उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे. सदर मेळाव्यात सहभाग विनामूल्य असून उपस्थितांना आपले ओळख पुरावे, बायोडेटा आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार
https://forms.gle/83kV8PdQG5USA8Ya8
येथे नोंदणी करू शकतात.पात्र सर्व उमेदवारांना या रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी केले आहे.
