Saturday, July 12, 2025
Google search engine
Homeसिंधुदुर्ग जिल्हादेवगडपडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या- स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी

पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या- स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी

आमदार नितेश राणे यांनी दिले आश्वासन ; लोकप्रतिनिधींच्या मागणीचा पाठपुरावा करू

देवगड | प्रतिनिधी

पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळवावा, ही मागणी २५ वर्षांपासून प्रलंबित आहे. पडेल सरपंच भुषण पोकळे यांच्या नेतृत्वाखाली पडेल दशक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी पंचायत सभापती व उपसभापती यांनी आमदार नितेश राणे यांना निवेदन दिले. या निवेदनात पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा आणि ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत पडेल गावात उभी राहावी, अशी मागणी करण्यात आली.

           लाभ १९ गावांच्या लोकसंख्येस

याचा लाभ जवळ जवळ इकडे असणाऱ्या १९ गावांना होणार असून त्यांची लोकसंख्या सुमारे ३० ते ३५ हजार इतकी आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुक्यातील खाडी लगतच्या गावातील रुग्ण इथे येतात, त्यांना सुद्धा फायदा होणार आहे. देवगड तालुक्याचे एक अर्धा भाग म्हणजे पडेल दशक्रोशी म्हणून ओळखली जाते, आणि त्यात बाजूलाच रत्नागिरी जिल्हा असल्यामुळे तिकडची एक दहा ते पंधरा गावातील लोक सुद्धा पडेल या गावी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी येतात. त्यांना सुद्धा याचा लाभ होईल.

             तातडीने कार्यवाहीची मागणी

जेणेकरून जसं देवगड हे उप जिल्हा रुग्णालय झाले आहे, त्याच धर्तीवर पडेल ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. हा विषय लोकांच्या आरोग्याचा असल्याने यावर तातडीने लक्ष घालून आम्हाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी या शिष्ठमंडळाद्वारे आमदार नितेश राणे यांच्याकडे करण्यात आली.

               आश्वासनाचा पाठपुरावा

याबाबत आमदार नितेश राणे यांनी लवकरात लवकर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार श्री नारायण राणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हाचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण व स्वतः आपण लक्ष घालून सदर मागणीचा पाठपुरावा करून लोकांची मागणी पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थिती बाळा खडपे, पडेल मंडळ अध्यक्ष बंड्या नारकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, माजी जि.प. सभापती संजय बोंबडी, माजी पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, उपसभापती रवींद्र तिर्लोटकर, माजी प.स. सदस्य शुभा कदम, महिला मोर्चा अध्यक्ष संजना आळवे, पडेल सरपंच भुषण पोकळे, उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, उपसरपंच विजयदुर्ग रियाज काझी, माजी सरपंच प्रसाद देवधर, रामेश्वर सरपंच सौ. मोनिका ठूकरूल, गिर्ये सरपंच सौ. लता गिरकर, तिर्लोट सरपंच सौ. जुवाटकर, माजी सरपंच अंकुश ठुकरूल, माजी उपसभापती नसीर मुकादम, माजी सरपंच रामेश्वर विनोद सुके, रामकृष्ण जूवाटकर, उपसरपंच अनिल पुरळकर, सौंदाळे सरपंच श्रीमती मनाली कामतेकर, महेश बिडये, प्रकाश पुजारे, ग्रेसीस फर्नांडिस, तसेच ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख पदाधिकारी, नेते, बूथ अध्यक्ष, व दशक्रोशीतील ग्रामस्त उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!