कडावल बाजारपेठेमध्ये झाला चोरीचा प्रयत्न ; व्यापाऱ्यांमध्ये घबराहट

0

कुडाळ | प्रतिनिधी

कडावल बाजारपेठेमध्ये चोरीच्या झालेल्या प्रयत्नमुळे व्यापारी वर्गामध्ये घबराहट निर्माण झाली आहे या अनुषंगाने कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री भालेराव यांनी व्यापारी संघटनेच्या बैठकीला उपस्थिती दर्शवून याबाबत चौकशी करून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले ही बैठक कडवल येथील मंदिरात संपन्न झाली.
कडावल बाजारपेठेत रात्री चोरी करण्याचा प्रयत्न करत असता एकाला पकडले तर अन्य दोघेजण पसार झाले त्यांच्या या दहशतीमुळे कडावल व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष वेधले आहे दरम्यान कुडाळचे पोलीस उपनिरीक्षक श्री. भालेराव यांनी तातडीने कडावल बाजारपेठ व्यापारी संघटना बैठकीत उपस्थिती दर्शवून व्यापारीवर्गाचे म्हणणे ऐकून घेतले याबाबत चौकशी करून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधिकारी श्री. भालेराव यांनी ग्रामस्थांना दिले यावेळी आवळेगाव दूरक्षेत्राचे पोलीस जमादार मंगेश जाधव, सुरज पवार कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, कडावल पोलीस पाटील सोमा सावंत, व्यापारी संघटनेचे गुरुनाथ मुंज, महापुरुष देवस्थानचे अध्यक्ष अमित कल्याणकर, कुडाळ व्यापारी संघटनेचे संतोष भोगटे सरपंच शितल कल्याणकर आदी व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. अनेकांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर झालेल्या चोऱ्या व दहशतवाद याबाबत चर्चा करून गुन्हेगारांची चौकशी करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. चोरांबाबत विजय अंबुरे कडावल व्यापारी यांनी कुडाळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नंदू मुंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.