सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चौपदरीकरण पूर्ण झाले पण या चौपदरीकरणाच्या बाजूला महामार्गाच्या जागेत अनधिकृत स्टॉल मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आले. आता हे स्टॉल हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्टॉल धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आणि हे स्टॉल काढण्यात यावेत असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गालगत असलेले स्टॉल धारक धास्तावले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्वी महामार्ग हा दुपदरीकरण होता त्यानंतर हा महामार्ग आता चौपदरीकरण झाला आहे त्यामुळे या महामार्गावरील वाहनांचा वेग हा जास्त असतो दुपदरीकरण असताना सुद्धा महामार्ग लगत स्टॉल होते अनेक अपघातही घडले आहेत. आता चौपदरीकरण महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्टॉल धारकांनी स्टॉल उभारले आहेत. आणि या स्टॉल धारकांना आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नोटिसा बजावण्यात आले आहेत. या नोटिशीमध्ये असे म्हणण्यात आले आहे की महामार्गावर अनधिकृत बांधकाम करून स्टॉल उभारण्यात आले आहेत ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसात हे स्टॉल काढावे अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल आणि हा खर्च स्टॉल धारकांकडून घेण्यात येईल असे म्हटले आहे या नोटिसीमुळे स्टॉलधारक धास्तावले आहेत याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गावर शेकडो अनधिकृत स्टॉल असल्याचे सांगून हे स्टॉल काढण्याची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल असे सांगितले.
