कसाल | प्रतिनिधी
जनसुविधा योजन अंतर्गत कसाल येथील सिध्दिविनायक मंदिर येथे पायाभूत सुविधांसाठी १५ लाख रुपये मंजूर कामाचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शुभहस्ते मंजूर कामाचा शुभारंभ करण्यात आला. निधी मंजूर केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत यांचा शाल श्रीफळ आणि महालक्ष्मी मातेची प्रतिमा देऊन ट्रस्ट माध्यमातून सत्कार करण्यात आला त्याच बरोबर पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्री.नारायण राणे याचे यावेळी मंदिर ट्रस्ट च्यावतीने विषेश आभार व्यक्त करण्यात आले यावेळी भाजपाचे श्री.दादा साईल, श्री.देवेन सामंत, कसाल सरपंच श्री.राजन परब, माजी पंचायत समिती सदस्य श्री.गोपाळ हरमलकर, सिध्दिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री.नवीन बांदेकर आणि सिध्दिविनायक मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी-सदस्य कसाल गावातील नागरीक उपस्थित होते.
