घावनळे खुटळवाडी येथे अवकाळी वादळी पावसामुळे अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे झाले नुकसान

0

भाजपा नेते निलेश राणे यांनी दिले मदतीचे आश्वासन

माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांनी मदतीचा हात केला पुढे 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

अवकाळी वादळी पावसामुळे घावनळे खुटवळवाडी येथील श्रीमती अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे पत्रे उडून गेले यामध्ये त्यांचे मोठे प्रमाणावर नुकसान झाले या कुटुंबीयांना ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य दिनेश वारंग यांनी तात्काळ आर्थिक मदत करून पंचनामे लवकर करण्यासंदर्भात ग्रामसेवकांना सूचना दिल्या. 

आज शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर रोजी झालेल्या मुसळदार पावसाने व वादळी वाऱ्याने घावनळे खुटवळवाडी येथील श्रीमती अन्नपूर्णा वसंत म्हापणकर यांच्या घराचे मोठया प्रमाणात पत्रे उडाले व घराचे व घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री दिनेश वारंग, ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश पारकर, श्री दिलीप पारकर, श्री संदीप पारकर, श्री नितीन परब, श्री भाई बिले, श्री पंढरी पारकर आणि खुटवळवाडी ग्रामस्थांनी पाहणी केली. व घरातील सदस्य यांना धीर दिला, दिनेश वारंग यांनी तात्काळ भाजपचे कुडाळ मालवण प्रभारी निलेश राणे यांना फोन करुन सांगितल. याबाबत भाजपचे नेते  निलेश राणेंनी आर्थिक सहकार्य करण्याच आश्वासन दिल. तसेच दिनेश वारंग व सहकारी यांनी ५ हजार रुपयाची तात्काळ मदत केली, तलाठी, ग्रामसेवक यांना फोन करुन तात्काळ पंचनामा करायला सांगितल. दरम्यान म्हापणकर कुटूंबातील सदस्य यांनी दिनेश वारंग व सहकारी यांचे आभार मानले