Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळजांभवडे ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत मंजूर, नवीन इमारतीसाठी २० लाखाचा निधी खर्ची...

जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयासाठी नवीन इमारत मंजूर, नवीन इमारतीसाठी २० लाखाचा निधी खर्ची होणार

जांभवडे सरपंच अमित मडव यांनी मानले निलेश राणे यांचे आभार

कुडाळ | प्रतिनिधी

जांभवडे ग्रामपंचायत कार्यालयाची नवीन इमारत व्हावी यासाठी गेली अनेक वर्षे पाठपुरावा सुरू होता, मात्र आवश्यक नवीन बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. या बद्दल जांभवडे सरपंच अमित मडव, माजी जि. प. सदस्य लोरेन्स मान्येकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळू मडव यांनी निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते त्यावर निलेश राणे यांनी जांभवडे दौऱ्या दरम्यान या ग्रामपंचायत बांधकामसाठी निधी उपलब्ध करून देण्याच आश्वासन दिलं होतं त्याची वचनपूर्ती करत जांभवडे ग्रामपंचायत बांधकाम साठी पहिल्या टप्यात ८ लाखांचा निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्यात व नारायणराव राणे यांचा खासदार निधी व इतर निधी उपलब्ध करून २० लाख रुपये खर्ची घालून सुसज्ज इमारत बांधकाम होणार आहे. 

गेल्या अनेक वर्षाची मागणी लक्षात घेता, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नेते निलेश राणे, माजी जि. प. सदस्य लोरेन्स मान्येकर यांचे जांभवडे गावाच्या वतीने सरपंच अमित मडव यांनी आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!