कुडाळ | प्रतिनिधी
भडगाव येथे पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली असल्याची चर्चा असून याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान पत्नीचा खून करून पती पळाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा कोण गळा आवळून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
भडगाव येथे बाहेर गावावरून कामानिमित्त आलेल्या एका इसमाने आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे चारित्र्याच्या संशयावरून हा खून झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे मात्र पती खून करून पळाला आहे तो अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. यासंदर्भात कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, आवळेगाव दूरक्षेत्राचे मंगेश जाधव इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
