कुडाळ | प्रतिनिधी
जो हिंदू की बात करेगा….. वही देश पे राज करेगा….. हिंदू एकजुटीचा विजय असो….. अशा घोषणा देत कुडाळ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने रत्नागिरी येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यापासून पोलीस ठाणे व तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शिवरायांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन मुस्लिम धर्मियातील काही समाज कंटकांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला त्याचा निषेध करण्यासाठी कुडाळ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून कुडाळ तहसीलदार वीरसिंह वसावे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे सरचिटणीस रणजित देसाई, वैद्य सुविनय दामले, मिलिंद देसाई, रमाकांत नाईक, प्रशांत धोंड, मंगेश नाडकर्णी, लवू म्हाडेश्वर, आनंद नाईक, विनय वर्दे, दीपलक्ष्मी पडते, विवेक पंडित, उदय कुडाळकर, शिवम म्हाडेश्वर, श्रीपाद तवटे, चांदणी कांबळी, रुपेश कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी मिलिंद देसाई यांनी सांगितले की, स्वयं सेवक संघाच्या विजया दशमी दिवशी झालेल्या संचालनामध्ये काही मुस्लिम बांधवांनी हे संचलन रोखण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली सामाजिक तेढ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशांवर कारवाई झाली पाहिजे जर अशा प्रकारे घटना घडत असतील तर आम्ही हिंदू म्हणून गप्प राहणार नाही जशा तसे उत्तर देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.
