महाराष्ट्रात पहिल्यांदाच नारळ पाडणाऱ्यांचा मेळावा

0

रत्नागिरी | प्रतिनिधी

आपले कोकण म्हटले की नारळाच्या बागा किंवा नारळाची वाडी असे नजरेसमोर येते. आपल्या कोकणात किंवा महाराष्ट्रात इतरत्र कुठे कोणीही आपले स्वप्नातले घर बांधत असेल तर त्या घराच्या परसात एक तरी नारळाचे झाड लावले जाते. जो नारळाचे झाड लावतो त्याला काहीच वर्षानंतर झाड उंच गेल्यावर त्या झाडावर चढता येतं नाही. ज्या ज्या वेळेस नारळ काढायचे असेल तर त्यावेळेस नारळ पाडणारे शोधले जाते व बोलवले जाते.

हे नारळ पाडपी वेगवेगळे राहून काम करत आहेत. त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये व स्वराज्य ऍग्र अँड अलाईड सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी यांच्या हॉलमध्ये आयोजित केलेले आहे.

या मेळाव्यामध्ये नारळ पाडपींच्या भविष्यातील संधी, त्यांच्या उत्पन्नात नियमितपणा कसे असेल याबद्दल माहिती दिली जाणार आहे. तसेच नारळ पाडपींचा जीवन विमा देखील काढून दिले जाणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्व नारळ पाडपींनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहावे.